मौनाची धार
विक्रमादित्यानं फर्मान काढलं. ते ऐकून त्या छोट्याशा देशातले नागरिक हैराण झाले, घाबरले. आदेश असा होता की, राज्यातल्या नागरिकांनी बोलायचं नाही. संपूर्ण मूकपणे व्यवहार करायचे. एक शब्दही तोंडातून काढला तर त्या व्यक्तीस चौकात चाबकाचे शंभर फटके फारच आगाऊ आणि बेताल बोलला आहे असं न्यायाधीशांना वाटले तर, जी काही संपत्ती असेल ती सरकारदरबारी जमा.. अर्थातच यातून फक्त वैद्य, सुरक्षा रक्षक, शिक्षक वगैरे अत्यावश्यक सेवा देणारे वगळले होते. जे काही बोलायचे आहे ते कागदावर वगैरे लिहून सांगायचे. अगदी बाजारपेठेत गेलात, आणि भाव करायचा तरी कागदाच्या एखाद्या तुकड्यावर लिहायचं. विक्रेत्यानं न बोलता काय जे असेल हो नाही तो व्यवहार करायचा. अगदी शेजाऱ्यानं जरी तक्रार केली की, अमुक तमुक हा माणूस काहीतरी बोलला, तरी तक्रार खरी मानून जेलमध्ये उचलबांगडी होणार. बरोब्बर १५ दिवसानंतर आदेश लागू होणार होता. त्यामुळे तेवढ्या दिवसात मोठमोठे तात्पुरते तुरुंग उभारले गेले. ठिकठिकाणाहून लाखभर रक्षक भरती झाली……. कुणीतरी गुरु महाराजांनी ग्रह तारे पाहून राजाला हा असा सल्ला दिला होता. राज्यातला कोलाहल, आवाज खूप वाढल्यानं...